Breaking News

खारघर परिसरात महायुतीतर्फे कॉर्नर सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उरण, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीतर्फे प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, त्या प्रचाराला

मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गावागावात, वाड्यांवर उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले जात असून, मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारांना दिली जात आहे. त्या अनुषंगाने खारघर येथे भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या वतीने ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. 

शिवसेनेचे प्रथमेश सोमण, खारघर शहर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सांस्कृतिक सेल रायगड जिल्हा संयोजक कीर्ती नवघरे, आरपीआय विद्यार्थी संघटना सुशील महाडिक आदींनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक पुन्हा जिंकणारच, असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही ताठ मानेने मतदारांपुढे जात असून, खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचा निर्धारही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply