Breaking News

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाला चंद्रप्रसाद अजिंक्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया स्कूल एसी हॉलमध्ये दिनांक 25 व 26 मे रोजी राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

विविध वयोगटामध्ये झालेल्या स्पर्धेत 411 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 232 स्पर्धकांनी रॅपीड रेटिंग, तर ब्लिट्झ रेटिंग स्पर्धेत 179 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात सहा आंतरराष्ट्रीय मास्टर, चार फिडे मास्टर, एक स्पर्धक मास्टर असून, 152 फिडे मानांकित खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून प्रेम पंडित, सहाय्यक पंच पवन राठी, तर स्पर्धेचे टुर्नामेंट डायरेक्टर समीर परांजपे यांनी काम पाहिले. बाला चंद्रप्रसाद यांनी दोन्ही रॅपिड रेटिंग  व ब्लिट्झ रेटिंग स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. रॅपीड रेटिंग, ब्लिट्झ रेटिंग स्पर्धेत एकूण रुपये तीन लाख 50 हजारांची रोख पारितोषिके 180 विजेत्यांमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. दोन्ही गटात ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्रथम रामन त्रिकाझीपुरम (केरळ), मुलींमध्ये रॅपीड रेटिंग  स्पर्धेत ग्रीष्मा धुमाळ, ब्लिट्झ स्पर्धेत तन्वी अधिकारी यांनी पुरस्कार मिळविला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह वर्षा विद्याविलास, अखिल मराठी बुद्धिबळ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संजय केडगे, खजिनदार राजेंद्र कोंडे, एम.एल.के.एस.एस.चे संस्थापक एन. डी. खान, राष्ट्रीय पंच शंकर बिराजदार, विनय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त करत त्यांचे यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पनवेल चेस असोसिएशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर, सचिव सी. एन. पाटील खजिनदार पंढरीनाथ मुंढे, सल्लागार मंगला बिराजदार, विकास घातुगडे, डॉ. प्रितम म्हात्रे, चिंतामणी रामतीर्थकर, अमित कदम, विजयकुमार पाटील यांनी मेहनत घेतली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply