Breaking News

पनवेल तालुक्यात 210 जण पॉझिटिव्ह

सात जणांचा मृत्यू; 237 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी   (दि. 30) कोरोनाचे 210 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 237 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 210 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 37 रुग्ण बरे झाले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल मिडलक्लास सोसायटीतील साई कृपा बिल्डिंग व विमलप्रभा सोसायटी, नवीन पनवेलमधील महाराजा अपार्टमेंट व सेक्टर 19 श्रीनिवास रोड प्लॉट 5, कामोठे विस्ता अवेन्यू आणि खारघर मधील प्रियदर्शनी सोसायटी मधील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 28, कामोठेमध्ये 32, खारघरमध्ये 31, नवीन पनवेलमध्ये 21, पनवेलमध्ये 34, तळोजामध्ये 18 नवीन रुग्ण आढळले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 6507 रुग्ण झाले असून 4947 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.03  टक्के आहे. 1400 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये आढळलेल्या रुग्णांत सुकापूर 11, करंजाडे सात,उलवे तीन, रिटघर, कोन, खानवळे, चिखळे, गव्हाण येथे प्रत्येकी दोन, सावळे  वलप, उमरोली, नेरे, मोहपे-पोयंजे, कुंडेवहाळ, काळोखे, बोर्ले  भिंगार, बेलवली, बारवई, पाले बुद्रुक, मोर्बे, पळस्पे आणि आदईमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. न्हावा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2055 असून 1603 जणांनी कोरोनावर मात केली असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 15 जणांना लागण

महाड : गुरुवारी नव्याने 15 जण आढळले. तर 21 जण बरे झाले व दोघांचा मृत्यू झाला. आढळलेल्या रुग्णांत गवळआळी दोन, सीटीप्रईड रेसी. दोन, शिवकृपा प्रभातकॅलनी दोन, काकरतळे, कांबळे तर्फे बिरवाडी, खरवली, वामनस्मृती, राजमुद्रा को.हौ.सो, प्रभातकॉलनी, रोहीदासनगर, महाड, नडगाव, हेरंभपार्क येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नवी मुंबईत 360 नवे बाधित

नवी मुंबई : नवी मुंबईत गुरुवारी 360 नवे रुग्ण आढळले. तर 362 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 14 हजार 987 तर बरे झालेल्यांची 10 हजार 116 झाली. आढळलेल्या रुग्णांच्या आकडेवारीत बेलापूर 45, नेरुळ 77, वाशी 32, तुर्भे 30, कोपरखैरणे 64, घणसोली 52, ऐरोली 50, दिघा 10 असा समावेश आहे.

रोहा तालुक्यात 17 कोरोनाबाधित

रोहे : रोहा तालुक्यात गुरुवारी 17 कोरोनाबाधित सापडले असुन यात शहरात आठ व ग्रामीण भागात नऊ कोरोना बाधित सापडले आहेत या मध्ये 13 पुरुषांचा व चार महिलांचा समावेश आहे. यात 60 वर्षावरील तीन वयोवृध्दांचा समावेश आहे.

रोहा तालुक्यात 17 कोरोना बाधीत गुरुवारी सापडल्यानंतर तालुक्यात एकुण कोरोना बाधित 551 झाले आहेत. आतापर्यंत 392 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 15 व्यक्तीना कोरोना संसर्गमुळ प्राण गमवावे लागले  आहे. रोहा तालुक्यात 144 सक्रीय कोरोना बाधीत असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार चालु आहेत.

उरण तालुक्यात 24 नवे रुग्ण

उरण : उरण तालुक्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह 24 रुग्ण आढळले असून 20 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डाऊरनगर उरण दोन, वशेणी उरण दोन, जसखार, बालई, म्हातवली, आवरे, गणेश नगर केगाव, सोनारी, जसखार उरण, क्लासिक पार्क को.ऑ.हॉसिंग सो. उरण, चिरनेर, कोटनाका, साई मंदिर जवळ उरण मोरा, बोकडवीरा, वाणीआली उरण, दिघोडे, श्रीयोग अपार्टमेंट उरण, पंचवटी करंजा, नवापाडा करंजा, केगाव, बोरखार, जासई येथे प्रत्येकी एक असे एकूण 24 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 852 झाली आहे. त्यातील 650 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यात 15 जणांना संसर्ग

कर्जत : कर्जत तालुक्यात गुरुवारी एका पशुवैद्यकीय अधिकार्‍यासह कोरोनाचे 15 रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात 487 कोरोना रुग्ण सापडले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 363 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये दहिवली दोन, नेरळमध्ये दोन, विठ्ठल नगर एक, म्हाडा वसाहत, कडाव, बेकरे, के. बी. के. नगर शेलू, पळसदरी, मोठे वेणगाव, कर्जत येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply