भाजपचे प्रभाकर घरत यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर येथील सेक्टर 3, 4 व खारघरमधील इतर परिसर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबाबत भाजपचे प्रभाकर घरत यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
प्रभाकर घरत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील सेक्टर 3, 4 व इतर ठिकाणी रसत्यामध्ये खड्डे पडलेले गेल्या तीन ते चार वर्षांपासून डांबरीकरण केलेले नाही. म्हणून त्या रस्त्याची खड्यामुळे चाळणी झाली आहे. त्यामुळे नागरीकांना खुप त्रास होत आहे. तेथील नागरिकांना त्रास होत आहे तसेच अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.
रस्त्याची डांबरीकरण लवकरात लवकर करावे. 21 दिवसांच्या आत चालु केले नाही, तर सिडको ऑफिस समोर जनतेचे साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा या देण्यात आला आहे.