Breaking News

सराव सामन्यात इंग्लंडचा अफगाणिस्तानवर विजय

लंडन :

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने वर्ल्डकप सराव सामन्यात मात्र अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला. जोफ्रा आर्चर आणि जो रूटच्या अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडने अफगाणिस्तानला 38.4 षटकांत 160 धावांत रोखले. यानंतर जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने विजयी लक्ष्य 17.3 षटकांतच पूर्ण केले.

अफगाणिस्तान संघाने आपल्या पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध चमक दाखवली होती. मात्र, इंग्लंडविरुद्ध त्यांचा निभाव लागला नाही. इंग्लंडने पहिल्या सामन्यात आर्चरला गोलंदाजी देण्यात आली नव्हती. या वेळी मात्र तो संघाचा प्रमुख गोलंदाज ठरला. त्याने सलामीवीर झझाई, रहमत शाह आणि मोहम्मद नाबी या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले. पार्ट टाईम फिरकी गोलंदाज जो रूटनेही तीन विकेट घेतल्या. खेळपट्ट्या फिरकीस अनुकूल असतील, तेव्हा त्याचा प्रभावी वापर करता येईल, याचा दिलासा इंग्लंडला मिळाला. नबीने 42 चेंडूंत 44, तर दवलत झार्दनने नाबाद 20 धावा करून अफगाणिस्तानला 160 धावांपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना रॉय आणि बेअरस्टोने 7.2 षटकांत 77 धावांची सलामी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply