Breaking News

सराव सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव ; धोनी आणि लोकेश राहुलची शतकी खेळी

लंडन : वृत्तसंस्था

विश्वचषकापूर्वीच्या दुसर्‍या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं.

टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं, पण भारताच्या प्रभावी मार्‍यासमोर बांगलादेशचा डाव अखेरच्या षटकात 264 धावांत आटोपला. लिटन दास आणि मुशफिकुर रहीमनं 120 धावांची भागीदारी रचून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. दासनं 73, तर रहीमनं 90 धावांची खेळी केली, पण हे दोघंही बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला.

भारताकडून कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी जोडगोळीनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं, तर जसप्रीत बुमरानं दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, टीम इंडियाने बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभ करण्यात लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीने मोलाचा वाटा उचलला. लोकेश राहुलने 99 चेंडूंमध्ये 108 धावा ठोकल्या. यामध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता, तर महेंद्रसिंह धोनीनेही शतक ठोकत आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात राहुल 6 आणि धोनीने 17 धावा करून करून बाद झाला होता.

  • जेव्हा धोनी बांगलादेशची फिल्डिंग लावतो

टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यात काल प्रॅक्टीस मॅच खेळण्यात आली. या मॅचमध्ये भारताने बाग्लांदेशचा 95 रनने पराभव केला, पण या मॅच दरम्यान एक गमतीदार प्रकार पाहायला मिळाला. हा प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये घडला. धोनीने बागलांदेश विरुद्धच्या सामन्यात चक्क बांगलादेशची फिल्डिंग लावली. 40 व्या ओव्हरच्या सुरुवातीला हा प्रकार पाहायला मिळाला. धोनी-केएल राहुल मैदानात खेळत होते. धोनी स्ट्राईकवर होता. बांगलादेशकडून सब्बीर रहेमान बॉलिंग करत होता. त्या दरम्यान धोनीला काहीतरी खटकले आणि बॉलरला थांबायला सांगितले. त्याला फिल्डिंगमधील चूक लक्षात आली. धोनीने तडक बॉलरला थांबवले. बांगलादेशचा एक फिल्डर चुकीच्या ठिकाणी उभा होता. ही चूक धोनीने लक्षात आणून दिली. धोनीने दुरुस्ती सांगितल्यानंतर बॉलरने देखील फिल्डरला योग्य ठिकाणी उभे राहायला सांगितले. या सर्व प्रकारानंतर मैदानात एकच हशा पिकला.

  • लोकेशने सोडवला चौथ्या क्रमांकाचा प्रश्न

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अखेर लोकेश राहुलने सोडवला. बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या सराव सामन्यात प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर राहुलने चौथ्या क्रमांकावर खेळताना शानदार शतकी खेळी केली. महेंद्रसिंग धोनीनेही तडाखेबंद शतक झळकावत मधल्या फळीत निर्णायक भूमिका निभावली. या दोघांच्या मोलाच्या योगदानानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्‍याच्या जोरावर भारताने बांगलादेशला 95 धावांनी नमविले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply