
उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार म्हणून दुसर्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ जेएनपीटी वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते दिनेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आदी. (छाया : जीवन केणी)