Friday , September 29 2023
Breaking News

लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांचा भारतीयांवर हल्ला

लंडन : वृत्तसंस्था

बालाकोटमध्ये भारताच्या एअर स्ट्राइकवरून संतापलेल्या पाकिस्तानकडून कुरापती करणे सुरूच आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्चायोगासमोर पाकिस्ताविरोधी घोषणाबाजी करणार्‍या भारतीय लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ही माहिती दिली आहे. ’एएनआय’ने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. आयएसआयच्या समर्थक असलेल्य लोकांनी भारतीय उच्च आयोगासमोर घोषणाबाजी करणार्‍या मूळचे भारतीय असलेल्या लोकांवर हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 9) घडली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती, परंतु चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. काश्मीरी आणि खलिस्तानी समर्थक संघटनांचे लोक भारताविरोधी घोषणाबाजी करीत होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काऊन्सिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये मारहाण झाली. या मारहाणीत कोणीही जखमी झाले नाही. एका व्यक्तीला चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply