Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भव्य रोजगार मेळावा 2019’ ; नावनोंदणी न करताही सहभागी होण्याची संधी

पनवेल ः प्रतिनिधी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवारी (दि. 8) पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे. यात इच्छुक उमेदवाराला नावनोंदणी न करताही थेट सहभाग घेता येणार आहे.

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात स.

9.30 ते दु. 4 वाजेपर्यंत  मेळावा होणार असून, 100पेक्षा जास्त कंपन्यांचा यात सहभाग असेल. सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकर्‍यांच्या संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवाराने बायोडाटाच्या सात प्रती, रहिवासी पुरावा आणणे आवश्यक आहे. नावनोंदणी केली नाही म्हणून इच्छुक उमेदवार या सुवर्णसंधीपासून वंचित राहू नये यासाठी नावनोंदणी न करताही उमेदवारांना थेट मेळाव्यात सहभाग घेता येणार असल्याची माहिती मल्हार रोजगारचे सागर माने यांनी दिली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply