Breaking News

लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये चार हजार 924 बाळांचा जन्म

कळंबोली : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर, येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार, येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार, प्रसूती एमजीएम रुग्णालय कामोठे येथील रुग्णालयात केले जात आहे. त्यानुसार, पनवेल पालिका हद्दीत कोरोना काळात शासकीय रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयात चार हजार 924 बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णांसाठी महापालिका क्षेत्रात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चार महिन्यांच्या काळात प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयाच्या योजना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे राबविल्या जात आहेत. या रुग्णालयात मोफत उपचारही दिले जात आहेत. तरीही मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात खासगी दवाखान्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. या काळात योग्य काळजी घेतल्याने पनवेल महापालिका हद्दीत चार हजार 924 बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे. यात कोरोनाची लागण कोणालाही झालेली नाही. दवाखान्यात माता प्रसूतीसाठी आल्यापासून ते घरी जाईपर्यंत कोरोना काळात नियमाचे सर्व पालन केल्यामुळे हे शक्य झाले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply