Breaking News

यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 10 वीचा निकाल 99.23%

उरण : प्रतिनिधी

जाहीर झालेल्या 10 वीच्या निकालात यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.23  टक्के निकाल लागला असून मेघ मिलिंद म्हात्रे याने 91.80 टक्के मिळवून पहिला क्रमांक,  नियती भावेश शाह हिने 88.80 टक्के मिळवून दुसरा क्रमांक तर  रश्मी आनंद भिंगार्डे हिने 88.40 टक्के मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.

यंदाचा 99.23 टक्के निकाल हा केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मक व उल्लेखनीयही आहे. म्हणूनच यु.ई.एस.च्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व पालक तसेच यु.ई.एस.च्या कमिटी मेंबर्सकडून गुणवान व यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेणार्‍या सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे. यु.ई.एस.चे अध्यक्ष आर्कि. तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, खजिनदार विश्वास दर्णे, माजी प्राचार्या व सदस्या प्रधान मॅडम, स्कुल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, माध्यमिक विभागाच्या सुपरवायझर्स सौ. सोनाली म्हात्रे व योगिता चौधरी यांच्या हस्ते टॉपर्स विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा निकाल  99.23% लागला असून शाळेतून एकूण 130 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 129 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत 102, द्वितीय श्रेणीत 22, तर पाच विद्यार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply