Breaking News

खारघर येथे दाखले वाटप शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पनवेल : प्रतिनिधी

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखले वाटप दोन दिवसीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी लाभार्थ्यांना भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले.

सरकारी दाखले मिळविण्याकरिता विद्यार्थी व नागरिकांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेवून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 6 व 7 जून रोजी खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात वय, अधिवास व डोमेसाइल, रहिवासी, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक, उत्पन्न, नॉन क्रिमिलेयर आदी शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यात आले.  शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply