Breaking News

नवमतदारांनी नाव नोंदणी करून घ्यावी

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी

निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 23-24 फेब्रुवारी रोजी दोन दिवस विशेष नावनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या वेळी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी पेण तालुक्यातील पात्र मतदारांनी नमुना नं.6 भरून संबंधित बीएलओकडे वा तहसील कार्यालयातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडे भरून जमा करावा. नमुना क्र.6 सोबत वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत तसेच रहिवासी पुरावा म्हणून रेशनकार्ड/वीजबिल/टेलिफोन बिल किंवा बँक पासबुकची छायांकित प्रत जोडावी.

1 जानेवारी 2019 अर्हतानुसार आधारित कार्यक्रमात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वा दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या नोंदणीचे मतदार ओळखपत्र येत्या 8 दिवसांत प्राप्त होणार असून, सदर ओळखपत्र संबंधित बीएलओ, तलाठी, कोतवाल यांच्यामार्फत मतदारांना घरपोच दिले जाईल. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply