Breaking News

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे चित्ररथाद्वारे जिल्ह्यामध्ये प्रसारण

अलिबाग : जिमाका

सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनांच्या संदेशाचे प्रसारण जिल्ह्यामध्ये चित्ररथाद्वारे करण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि. 20) जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना ह्या मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी असतात. या योजनांचा अधिकाधिक प्रसार होऊन त्या जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी चित्ररथाद्वारे जिल्ह्यामध्ये त्याचे प्रसारण होणार आहे. या वेळी जात प्रमाणपत्र पडताळणीचे जिल्हा उपायुक्त विशाल नाईक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील, एम. एल. जाधव, ए. आर. मोरे,  के. ए. म्हेत्रे, योगेश ठाणगे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड कार्यालय व महामंडळाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply