पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्या आणि मदत करणार्यांना भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त प्रदान करून शनिवारी (दि. 8) सन्मानित करण्यात आले.
गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, अरुण कोळी, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी औषधनिर्माण अधिकारी रवींद्र शिंपी, आरोग्य सहाय्यक आरोग्य प्रकाश म्हात्रे, संजय गावडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनीता नीरज वानखेडे, गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा धोटे, आरोग्यसेविका स्नेहा राजेंद्र पेडणेकर, न्हावा उपकेंद्र आरोग्यसेविका अंजनी तोंडलेकर, जगदीश कदम, वहाळ उपकेंद्र आरोग्यसेविका सारिका म्हात्रे, ओवळा उपकेंद्र आरोग्यसेविका नीलम वझरकर, दापोली उपकेंद्र आरोग्यसेविका अलका वायरे, शामकांत म्हात्रे, वडघर उपकेंद्र आरोग्यसेविका अंजना गायकवाड, सचिन सोनावणे, ग्रामसेवक एम. डी. पाटील, गव्हाण केंद्रप्रमुख एस. एम. जोशी, कोपरचे शिक्षक नितीन ठाकूर, जय बजरंग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे विजय घरत, जे. एम. म्हात्रे सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, कनिष्ठ सहाय्यक प्रवीण कोळी, आशा वर्कर नीता देशमुख, गटप्रवर्तक आरती कोळी, सुलभा गायकर, शिपाई बाळकृष्ण महादेव सावंत यांना कोविड योद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …