Sunday , October 1 2023
Breaking News

पेणमध्ये रक्तदान शिबिर

पेण : प्रतिनिधी

शिवजयंतीचे औचित्य साधून येथील सिद्धेश्वर मित्र मंडळाने पेणमधील महात्मा गांधी वाचनालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 77 तरुणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक समीर म्हात्रे, वाचनालयाचे अरविंद वनगे, शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पा सत्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते जयेश म्हात्रे यांनी रक्तदान शिबिराचा उद्देश सांगितला. कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या रक्तपेढीने शिबिरात रक्त संकलन केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply