अलिबाग : प्रतिनिधी
शहराच्या वेशीवर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीची सर्वत्रिक निवडणूक 23 जून रोजी होत आहे. भाजप व मित्रपक्षाच्या आघाडीला चेंढरेमध्ये मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चेंढरे ग्रामपंचयात हद्दीमधील रोहिदासनगर येथील भालकर परिवाराने गुरुवारी (दि.13) भाजपत प्रवेश केला.
अलिबाग येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटखानी कार्यक्रमात अविनाश भालकर, विनोद भालकर, दीपक भालकर, दामू भालकर, प्रभाकर भालकर, हितेश भालकर, भारती भालकर, रोहिणी भालकर, सुषमा भालकर, ओंकार भालकर, पार्थ भालकर, संमदा भालकर, हिमांशू भालकर, वैभव भालकर यांनी गरुवारी भाजपत प्रवेश केला. त्यांचे भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, अॅड. परेश देशमुख, निलेश महाडिक, शेखर वारंगे आदी उपस्थित होते.