महाड : प्रतिनिधी
महाडचे माजी आमदार तथा काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप यांचे रविवारी (दि. 25) रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. कै. माणिक जगताप यांच्यावर महाड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.
Check Also
विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …