Breaking News

शिक्षणाचा श्रीगणेशा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात मातृभाषेतूनच बहुतेकांनी शिक्षण घेतले. परंतु हलकेहलके इंग्रजी माध्यमाचे महत्त्व वाढत गेले. आज तळागाळातील माणसालाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायचे असते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्याखेरीज वरचा स्तर गाठणे शक्य नाही असा समज आपल्या समाजात एव्हाना खोलवर रुजला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावरच शिक्षण क्षेत्रातील अवघ्या घडामोडी घडत असतात. आधी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. नंतर हलके हलके केंद्रीय बोर्डांच्या शाळांचे प्रस्थ वाढू लागले.

गेल्या आठवडा-पंधरवडाभर अथवा त्याहूनही अधिक काळ वृत्तपत्रांमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित बातम्या मोठ्या संख्येने येत आहेत. नेमेचि येतो पावसाळा या धर्तीवर जून-जुलैच्या  काळात शिक्षण क्षेत्राविषयीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये अग्रक्रमाची जागा पटकावतात. अन्य क्षेत्रातील घडामोडींपेक्षा या काळात या बातम्या निश्चितपणे अधिक वाचल्यादेखील जात असतील. कारण आपल्या मुलांचे शिक्षण, त्यांची उच्च शिक्षणाकडे चाललेली वाटचाल व पुढे त्यातूनच साकारणारी त्यांची कारकीर्द हा बहुतेक सर्वसामान्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू असते. जूनच्या 13 तारखेला वा आगेमागे बहुतेक शाळा सुरू होतात, तेव्हा तिथल्या गर्दीत या आकांक्षांचे साक्षात प्रतिबिंब उमटते. जवळपास स्वत:एवढ्याच आकाराच्या दप्तराचे ओझे सांभाळत चिमुकली पावले शाळेच्या दिशेने पडतात तेव्हा त्यांच्या घराच्या सुरक्षित भिंतींच्या पलीकडच्या जगण्याचा तो श्रीगणेशा असतो. दूरवरच्या भविष्यातील त्यांच्या भरारीची ती नांदी असते. सामान्यातला सामान्य माणूसदेखील मोठ्या उमेदीने शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडत असतो. शिक्षणाची ही वाट सातत्याने स्थित्यंतरांतून जात आली आहे. प्राचीन काळी आपल्या देशात असलेली गुरुकुलाची पद्धत काळाच्या ओघात मागे पडून ब्रिटिश काळात शिक्षणाला पाश्चात्य देशांतील पद्धतीप्रमाणे संस्थात्मक रूप प्राप्त झाले. त्यानंतरही शिक्षणाच्या स्वरुपात अनेक प्रकारचे बदल सातत्याने होत आले आहेत. स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षणासाठीच्या अनेक प्रवेश परीक्षांमध्ये केंद्रीय बोर्डांचे विद्यार्थी अधिक उत्तम कामगिरी करत असल्याचे सातत्याने समोर आल्यामुळे केंद्रीय बोर्डांच्या शाळांकडे विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढू लागला आहे. कोणे एके काळी, डॉक्टर, इंजिनीअर आणि वकील याखेरीज कारकीर्दीचे अन्य पर्याय फारसे ज्ञात नव्हते. परंतु आता परिस्थिती बदलते आहे. कारकीर्दीच्या निरनिराळ्या वाटा विद्यार्थी चोखाळत आहेत आणि त्यांना त्यांची माहितीही घरबसल्या इंटरनेटवरून उपलब्ध होते आहे. त्यामुळेच कालपरवापर्यंत विज्ञान-कॉमर्स या शाखांना दिला जाणारा प्राधान्यक्रम गेल्या एक-दोन वर्षांपासून आर्ट्स शाखेने पटकावला आहे. विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच कौशल्यशिक्षण देण्याची गरजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वेळीच ओळखून त्याअनुषंगाने बदलांना चालनाही दिली गेली आहे. त्यामुळेच वेगळ्या वाटा चोखाळण्यासही आजचा विद्यार्थी कचरताना दिसत नाही. नियमित शाळांप्रमाणेच होम स्कूलिंग अर्थात मुलांना घरीच शिकवण्याची पद्धतही हलकेहलके मूळ धरते आहे. सरकारी पातळीवरही या बदलांची नोंद घेतली जाऊन ओपन बोर्डासारखे पर्याय समोर येत आहेत. नुकतेच मोदी सरकारने नवे शैक्षणिक धोरणही चर्चा व सूचनांकरिता लोकांसमोर आणले आहे. या नव्या धोरणातूनही अनेक नव्या बदलांची सुरुवात होईल.

Check Also

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply