Breaking News

कुंडलिका नदीत बुडालेला तिसरा पर्यटक सापडला

रोहे ः प्रतिनिधी

कोलाड विभागातील बल्हे येथे मुंबई येथून आलेले तीन पर्यटक कुंडलिका नदीत बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यातील दोघांचे मृतदेह रविवारीच सापडले होते. सोमवारी सकाळी तिसरा पर्यटक महेश जेजुरकर याचा मृतदेह पोलीस व रेस्क्यू टीमच्या हाती लागला.

मुंबईतील ट्रॉम्बे येथील 28 जण शनिवारी कोलाड (ता. रोहे) विभागातील बल्हे येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण आंघोळीसाठी कुंडलिका नदीच्या काठी आले. तेथे पाय घसरल्याने महेश जेजुरकर (39) नदीपात्रात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा भाऊ परेश जेजुरकर (35) आणि अक्षय गणगे (29) पाण्यात वाहून गेले होते. त्यानंतर तब्बल चार तासांनी रेस्क्यू टीमला सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास परेश जेजुरकर याचा आणि सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास अक्षय गणगे याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. रात्र झाल्याने 9 वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम थांबविण्यात

आली होती. दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून कोलाड पोलीस व रेस्क्यू टीमने शोधकार्यास पुन्हा सुरुवात केली. सकाळी 10.40 च्या सुमारास महेश जेजुरकर याला शोधण्यात या टीमला यश आले. या सर्वांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये महेश व परेश हे दोघे सख्खे भाऊ होते. या दोन्ही भावांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply