Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये विविध विकासकामांचा थाटात शुभारंभ

खारघर ः प्रतिनिधी

खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन या परिसरामधील विविध कामांचा शुभारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमांचे आयोजन नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन येथील सर्व सोसायटींना रंगरंगोटी करणे, महानगर गॅस कंपनीकडून वास्तूविहार व सेलिब्रेशनमधील सर्व सोसायट्यांमध्ये गॅस लाईन कामाचा शुभारंभ आणि वास्तूविहार व सेलिब्रेशन परिसरात वृक्षारोपण करणे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कामांचा शुभारंभ सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका संजना कदम यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष शत्रृघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बावीस्कर, प्रवीण पाटील, रामजी बेरा, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, सरचिटणीस दीपक शिंदे, संतोष शर्मा, कीर्ती नवघरे, गीता चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील रहिवासी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply