Breaking News

स्वस्तातली गाडी पडली महागात; व्यावसायिकास सहा लाखांचा गंडा

महाड : प्रतिनिधी

येथील औद्योगिक क्षेत्रात रसायनाचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाला कमी दराने निसान कंपनीची किक गाडी देतो असे सांगून त्याला उत्तर प्रदेशातील दोघांनी सहा लाख रुपयांना गंडा घातला आहे. महाड एमआयडीसीमध्ये 15 मार्च ते 24 जून 2019 या कालावधीत ही घटना घडली. रसायन व्यावसायिक सुहास राणे यांनी याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुहास राणे यांना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राहणर्‍या दिलिप पांडे व रुपेश त्रिपाठी या दोघांनी कमी दरात निसान कंपनीची किक गाडी देतो असे अमिष दाखवले व वेळोवेळी त्यांच्या अकाउंन्टमधे पैसे भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे राणे यांनी त्यांच्या अकाउंन्टमध्ये एकूण सहा लाख रूपये भरले. परंतु पैसे भरुनही राणे यांना निसान कंपनीची किक गाडी मिळाली नाही, तसेच सहा लाख रूपये परत न करता त्यांच्या पैशाचा अपहार करून राणे यांची फसवणूक केली. याबाबत अधिक तपास हवालगार एस. एन. घरत हे करीत आहे.

-महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले, कांदळे गावातील घटना

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते बहिरोळे असा रिक्षाने प्रवास करणार्‍या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र व चैन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून जबरी चोरी केली.

अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील महिला त्यांच्या नातेवाईकांकडील पुजेचा कार्यक्रम आटोपून सोमवारी सायंकाळी 6.45 च्या सुमारास रिक्षाने पेण ते बहीरोळे असा प्रवास करीत होती. कांदळे गावच्या हद्दीत वाहतूक कोंडीमुळे रिक्षा थांबली असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र व चैन असे दागिने हिसकावून पोबारा केला. चोरीस गेलेल्या या दागिन्याची किंमत 1 लाख 80 हजार रूपये आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक  निरीक्षक श्री. शिंदे करीत आहेत.

-माणगाव काळ नदीपात्रात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

माणगाव : येथील काळ नदीपात्रात खांदाड गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 25) दुपारी एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नगरपंचायत व उपजिल्हा रुग्णालय कर्मचार्‍यांना बोलावून सदरचा मृतदेह काढला.

या घटनेतील मयत व्यक्ती हिशामुद्दीन हुसेन शेख (35, रा. म्हसळा) हा मनोरुग्ण असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. तो काळ नदीत आंघोळीसाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply