पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा धडाका सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे आणि निधीमधून ग्रामीण भागातील सुमारे दोन कोटी 30 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे 50 लाख रुपयांच्या एमएमआरडीए निधी अंतर्गत शिवणसई येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, एक कोटी रुपयांच्या एमएमआरडीए निधीतून दुंदरे गाव अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, 50 लाखांच्या निधीतून वाकडी गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीमधून भानघरमध्ये गणेश घाटाचे बांधकाम तसेच 20 लाख रुपयांच्या निधीतून हरिग्राम गाव अंतर्गत रस्ता आणि गोपाळ ठाकरे ते विश्वास म्हात्रे यांच्या घरापर्यंतचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या समारंभांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, एकनाथ देशेकर, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी सरपंच नरेश पाटील, रमेश पाटील, अनुराधा वाघमारे, विष्णू वाघमारे, लक्ष्मण हिलम, गजानन हिलम, बाळू हिलम, मनोहर पवार, शंकर पवार, विठ्ठल पाटील, काळूराम पाटील, मनीषा वाघमारे, रेखा हिलम, तुळसा हिलम, लीला कातकरी, अशोक वाघमारे, अशोक पवार, संदेश पालांडे, मनोज वाघमारे, रमेश पाटील, शेवंता वाघमारे, लक्ष्मी वाघमारे, सुगंधा कातकरी, चंद्रकांत वाघमारे, विनोद पाटील, शुभम साई, ग्रामपंचायत सदस्य ललिता चौधरी, राणी सिनारे, माजी उपसरपंच किशोर पाटील, भाऊबुवा सिनारे, नाना पाटील, अमर पाटील, महिंद्र सिनारे, रूपेश पाटील, राजेश चौधरी, महेंद्र सिनारे, उपसरपंच विश्वास म्हात्रे, धनाजी म्हात्रे, निवास म्हात्रे, अशोक माळी, बुधाजी पारधी, दत्ता म्हात्रे, रवी म्हात्रे, सदानंद म्हात्रे, भरत भोपी, बाळाराम भोपी, कृष्णनाथ भोपी, विष्णू म्हात्रे, माजी सरपंच शांताराम पोपेटा, गाव कमिटी अध्यक्ष नारायण माळी, माजी सरपंच माधुरी नितीन पोपेटा, अलका प्रकाश तांडेल, माजी उपसरपंच रोशन पोपेटा, गाव कमिटी उपाध्यक्ष मदन मढवी, रघुनाथ मोहिते, हिरा पोपेटा, जगन पोपेटा, सुनील मढवी, भरत तांडेल, अनंता मोहिते, रमेश, दिनेश पोपेटा, गुरूनाथ भोपी, गुलाब चौधरी, शांताराम चौधरी, नारायण चौधरी, विष्णू चौधरी, काशिनाथ चौधरी, तुकाराम चौधरी, भगवान चौधरी, सुनील चौधरी, हनुमान चौधरी, भरत चौधरी, संजय जळे, गुलाब सिनारे, राम खारूटकर, विलास खारूटकर, चंद्रकांत चौधरी, पांडुरंग शेळके, संजय चौधरी, राजाराम चौधरी, अनंता चौधरी, रवींद्र चौधरी, भाऊ चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …