पेण : प्रतिनिधी
तालुक्यात शुक्रवारी (दि. 11) पहाटे तीन ते चार तास पावसाच्या सरी बरसल्याने कडधान्य व आंबा पिकाला धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने स्थानिक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पावसाळ्यात भातपीक घेतल्यानंतर शेतकरी वाल, चवळी, हरभरा, तूर अशा कडधान्य पिकांचे उत्पादन घेतात. कडधान्य पिकांना पाऊस चालत नाही. लहान असलेली रोपे अवकाळी पावसाने जमीनदोस्त होत असतात. शुक्रवारी पहाटे सलग तीन-चार तास पाऊस पडल्याने या पिकांना धोका निर्माण झाला आहे.