Breaking News

दाखणे ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी; राष्ट्रवादीला धक्का

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील दाखणे ग्रुपग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 3 मधील   पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सिताराम महिपत उभारे विजयी झाले असून, या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पुरस्कृत पद्माकर सखाराम उभारे यांचा 62 मतांनी पराभव केला.

दाखणे ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. मात्र गतवर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी शिवसेना पुरस्कृत विश्वास उभारे निवडून आले. त्यावेळी ते प्रभाग क्र 3 मधून सदस्यपदीही निवडून आले होते. मात्र सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विश्वास उभारे यांनी सदस्यपदाचा राजिनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या  प्रभाग क्र. 3 च्या सदस्य पदासाठी रविवारी (दि. 23) पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात शिवसेना पुरस्कृत सिताराम उभारे यांना 262 तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार पद्माकर उभारे यांना 200 मते पडली.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply