Saturday , March 25 2023
Breaking News

क्रिकेटपटू करुण नायरचे समुद्रकिनारी गर्लफ्रेण्डला प्रपोज

मुंबई : प्रतिनिधी

कसोटी क्रिकेटपाठोपाठ आयपीएलमध्ये चमक दाखवणारा क्रिकेटपटू करुण नायरने नुकतेच गर्लफ्रेण्डला प्रपोज केले. सनया तनकारीवालासोबत करुण लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. करुणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

समुद्रकिनारी सुटीवर गेल्याची संधी साधत करुणने सनयाला प्रपोज केले. गुडघ्यावर बसून करुणने आपल्या गर्लफ्रेण्डला लग्नाची मागणी घातली. तिनेही जराही वेळ न दवडता करुणला होकार दिला. करुण आणि सनया गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी या क्षणांचे फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

27 वर्षांच्या करुणने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. 2013-14मधील रणजी पदार्पणातच करुणच्या कर्नाटक संघाने करंडक जिंकला होता. रणजीच्या अंतिम फेरीत त्रिशतक झळकवणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. 2016मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून करुणने वनडेमध्ये पदार्पण केले, तर त्याच वर्षी मोहालीमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद पदार्पणातील त्रिशतक झळकाविण्याचा मान करुणने पटकाविला आहे. कसोटीमध्ये त्रिशतक ठोकणारा वीरेंद्र सेहवागनंतरचा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला, तर पदार्पणातील शतकाचे त्रिशतकात रूपांतर करणारा तो बॉब सिम्पसन आणि सर गारफील्ड सोबर्सनंतरचा जगातील तिसराच फलंदाज आहे.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply