Breaking News

महाडमधील निराधारांना पेन्शनचा आधार

महाड : प्रतिनिधी

तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  महाड तहसिलदार यांच्या दालनात झाली. या बैठकीत 150 निराधारांना पेन्शन मंजूर करण्यात आली. तर दाखल्यांच्या अभावी आठ अर्ज स्थगित ठेवण्यात आले. दरम्यान, निराधारांची पेन्शन 600 वरून 1000 रुपये केल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीस छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. समिती सचिव तथा तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी 158 अर्ज समितीसमोर सादर केले. छाननी दरम्यान आठ अर्जाना दाखले न जोडल्या कारणाने स्थगित ठेवण्यात आले. तर 58 अर्जांना समितीने मान्यता दिली. तसेच संजय गांधी निराधार अनुदान विधवा योजनेसाठी प्राप्त 26, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब साठी प्राप्त 38, तर राज्य आणि केंद्र यांच्या एकत्रीत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, अपंग, विधवा यांच्या 28 अर्जांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीला समिती सदस्य रश्मी वाझे, गणेश फिलसे, रामचंद्र भोसले, नायब तहसिलदार प्रदिप कुडळ, लिपीक शिर्के आणि शिंदे उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply