Breaking News

अमृता भगत ठरली पॉवर वूमन; राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विजेती

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील शेलू गावची रहिवासी आणि नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयाची विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत ही महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पॉवर वूमन ठरली. मुंबईच्या कामगार क्रीडा मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अमृताने क्लासिक क्रीडा प्रकारात ज्युनियर आणि सिनियर या दोन्ही गटांत बाजी मारली आणि तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निर्माण केली आहे. जिल्हा आणि विभागीय पातळीवर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पॉवर वूमन ठरलेल्या अमृता हिची महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. ग्रामीण भागातून राज्यस्तरीय स्पर्धेत पोहचलेल्या अमृताने आपल्या कामगिरीत पुन्हा एकदा कमालीचे सातत्य दाखवले. स्पर्धेतील आपल्या गटाचे प्रथम पारितोषिक आणि पॉवर वूमन हा बहुमान तिने मिळविला. या यशाबद्दल अमृताचे सर्वत्र कौतुक होत असून नेरळ येथील महाविद्यालयात तिचा मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply