Thursday , March 23 2023
Breaking News

भर सभेत मोदींचा जयजयकार

चुरू : वृत्तसंस्था

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले असताना, चुरूमधील सभेत उपस्थित नागरिकांकडून मोदी, मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोदींनी नुकतेच भारतीय लष्कर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला कोठे, कसा आणि कधी घेईल हे ठरवेल, असे म्हटले होते. त्यानुसार भारतीय लष्कराने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करत 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यानंतर प्रथमच मोदी सभेच्या माध्यमातून संबोधित करत होते. या सभेत मोदींनी हल्ल्याचा उल्लेख करत भारतीय लष्कराला नमन केले. देशापेक्षा मोठे काहीच असू शकत नाही. याच भावनेने आम्ही काम करत आहोत. प्रधानसेवक आपले काम करत आहे, असे मोदींनी म्हटले आहे. या वेळी मोदींनी 2014 मध्ये केलेल्या कवितेची आठवण करून दिली. या वेळी मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याची आठवण करून देताच उपस्थितांमध्ये जल्लोष पसरला.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply