माणगाव: प्रतिनिधीमाणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातून दिघी- पुणे महामार्ग व मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराच्या सौंदर्यात व व्यावसायिक उत्पन्नात भर पडत आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून माणगांव शहरात दिघी-पुणे महामार्गावर रेल्वे क्राँसिंग ब्रीज आहे. या ब्रीज खालूनच पुणे-दिघी महामार्ग म्हणजेच माणगांवकरांचा निजामपूर रोड आहे. या ब्रीजखाली नेहमी सांडपाणी साठलेले असते. विषेश म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारे आहेत. मात्र डाव्या बाजुचे गटार अतिक्रमणामध्ये अर्धवट बुजवून टाकलेले असल्याने गटारातील सांडपाणी सदानित्य रस्त्यावर तुंबुन राहत आहे. यामुळे आता पावसाळा असल्याने व रस्ता सिमेंट काँक्रीट असल्याने सद्यस्थितीत शेवाळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांडपाण्याची दुर्गंधी ही तितकीच पसरली आहे. कोरोनासोबतच इतर रोगराई या सांडपाण्यामुळे पसरण्याची दाट शक्यता आहे.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper