Breaking News

वादळी वार्याने आदगाव शाळेचे छप्पर उडाले

श्रीवर्धन : प्रतिनिधी

वादळी वार्‍याने श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे व कौलाचे छप्पर उडाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 4) दुपारच्या सुट्टीत ही घटना घडल्याने सुदैवाने विद्यार्थी बचावले. स्थानिक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन सदस्याने या बाबत शाळा दुरूस्ती बाबत प्रत्रव्यहार केला असळयाचे समजते परंतु हयाकडे प्रशासनाने ग्रांभीयाने दखल घेतली गेली नसळयाचा आरोप शाळा व्यवस्थापक सदस्य व स्थानिक नागरिकां कडुन वर्तविला जात आहे. आदगाव प्राथमिक शाळामध्ये एकूण पाच वर्ग खोल्या असून, वाळवी लागल्याने संपुर्ण शाळा धोकादाय झाली होती.  या शाळेमध्ये एकुण 68विद्यार्थी असून, तीन शिक्षक कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे शाळेच्या एका वर्ग खोलीचे पत्रे तर दुसर्‍या खोलीचे कौलारू छप्पर उडाले. तर अन्य दोन खोल्याची आवस्था अतिशय दैयनिय झाली आहे. डिजिटल रूममधील शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शाळेची संपुर्ण इमारत धोकादायक झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून गावातील मंदिरात आणि एका व्यासपिठावर शाळा भरविण्यात येत आहे. या दुर्घटनेत सुमारे 9 ते 10 लाखाचे नुकसान झाले.  श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी वाय. एन. प्रभे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, गटशिक्षण अधिकारी राऊत, केंद्रप्रमुख पिगडे आदीनी या शाळेची पाहणी केली.

वादळी वार्‍यामुळे आदगाव जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पहाणी केली असून, दुरुस्तीसाठी सुमारे नऊ लाख रूपयांचे अंदाज पत्रक तयार केले असून ते तातडीने  जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येत आहे. लवकरच दुरूस्तीचे काम करण्यात येईल. विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

-बाळासाहेब भोगे, सहाय्यक गटविकास अधिकारी, श्रीवर्धन

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply