Breaking News

खालापुरातील धरणे सुरक्षित तरीही फेरतपासणी व आढावा सादर होणार

खोपोली : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील तीवरे धरण फुटून घडलेल्या मोठया दुर्घटने नंतर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी   जिल्ह्यातील सर्व धरणाचा आढावा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतचा समनव्यक व अहवाल देण्याची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आहे. खालापूर तालुक्यातील धोरणाबाबत आढावा  घेण्याचे कामही सुरू झाले आहे. या बाबत प्राथमिक माहिती देतांना तहसीलदार इरेश चपलवार यांनी सांगितले की, खालापूर तालुक्यातील कोणतेही धरण धोकेदायक नाही. तरीही सर्व धरणांची फेरतपासणी करून, त्यानुसार सविस्तर आढावा सादर केला जाणार आहे.

खालापूर तालुक्यात कलोते (मूळ साठा क्षमता  419 लक्ष घन मीटर), डोनवत (मूळ साठा क्षमता 315 लक्ष घन मीटर) आणि भिलवडे (मूळ साठा क्षमता-210 लक्ष घन मीटर)  हे तीन लघु आणि नवी मुबंई महानगरपालिकेच्या मालकीचे मोरबे  हे मध्यम वर्गातील धरण आहे. तालुक्यात एकूण  चार धरणे आहेत. या सर्व धरणांची सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम व इतर स्थिती मजबूत असून, कोणत्याही ठिकाणी धोकेदायक स्थिती नाही. वर्तमान स्थितीत हे चारही धरणे 60 ते 65 टक्के भरली आहेत. तसेच पावसाचा अंदाज व धरणांची पातळी यांचे नियोजन सुरळीत होण्यासाठी गरजेनुसार पाणी निचरा करण्यात येतो.

मात्र येथील सर्वच धोरणांवर पावसाळी पर्यटनासाठी येत असलेले पर्यटक व त्यांच्याकडून अतिउत्साहीपणात घडणारे प्रकार ही मोठी समस्या बनत आहे. या बाबतीतही खालापूर पाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासन यांनी योग्य उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार धरणांची गस्त वाढविण्यात आलेली आहे. धरणाला लागून होणारे अनाधिकृत माती उत्खनन व बांधकामे या गोष्टी   धरणे सुरक्षित ठेवण्याआड येत असल्याने, या ही बाबत त्वरित कारवाईचे निर्देश खालापूर तहसीलदार चपलवार यांनी दिले आहेत.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply