Breaking News

‘अलिबाग से आया है क्या?’ बंदीची याचिका फेटाळली

मुंबई : प्रतिनिधी

‘अलिबाग से आया है क्या?’ या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी (दि. 19) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

‘अलिबागहून आलायस का?’ किंवा ‘अलिबाग से आया है क्या?’ हे डायलॉग अपमानजनक असल्याच्या भावनेपोटी अलिबाग तालुक्यातील सातिर्जे गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अ‍ॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सिनेमा, नाटके, टीव्ही मालिका, सार्वजनिक सादरीकरणे, स्टँडअप कॉमेडी इत्यादींमध्ये या डायलॉगचा वापर करण्यास बंदी घालावी, अशी विनंती या याचिकेद्वारे केली होती. त्यावर ‘विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसतात,’ असे नमूद करीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, अलिबागकरांच्या भावनांचा विचार करायला हवा होता, असे येथील नागरिकांना वाटते. उच्च न्यायालयाने कोणत्या कारणांनी ही याचिका फेटाळली? आपण कुठे कमी पडलो आहोत? याचा अभ्यास करून याबाबत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी, असे मत कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply