Breaking News

चोळई नदीमध्ये बुडणा़र्यास वाचवणारा अत्यवस्थ

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चोळई नदीमध्ये उतरलेला एक कामगार  पाण्याचा प्रवाह वाढल्याने घाबरून मध्यभागी झालेल्या बेटासारख्या भागामध्ये उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला अन्य कामगार नदीपात्रात कोलांट्या खाऊ लागल्याने घाबरून अत्यवस्थ झाला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत कशेडी घाटाच्या प्रारंभी चोळई गावाच्या मागच्या बाजूने वाहणार्‍या चोळई नदीपात्रामध्ये सोमवारी (दि. 8) दुपारी तेथे सुरू असलेल्या रो हाऊसेसच्या बांधकामातील दोघे कामगार आंघोळीकरीता उतरले होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यापैकी एक कामगार नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर जाऊन बसला. त्याला वाचविण्याचा प्रयत्नामध्ये त्याचा साथीदार अरविंद कुमार (रा. उत्तर प्रदेश) हा टायर घेऊन त्याच्यापर्यंत जात असताना चोळई नदीमध्ये कोलांट्या घेऊ लागला. त्याला बेशुद्ध अवस्थेत नदी बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याला बेशुद्ध अवस्थेत महाड ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये  पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. राजेश सलागरे यांनी दिली.

 दरम्यान, काही तरुणांनी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली चोळई नदीपात्रामध्ये उतरून बेटावर अडकलेल्या त्या कामगाराची सुखरूप सुटका केली. पोलादपूर पोलिसांनी महाड नगरपालिका आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. मात्र, अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापुर्वीच दोन्ही कामगारांना नदीपात्रा बाहेर काढण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply