पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई युवा संस्था पनवेल अध्यक्ष, टायगर ग्रुप रोहिंजण-तळोजा सदस्य प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहिंजण येथील जागृतेश्वर शिवमंदिर येथे नाश्ता वाटप, नवीन वसाहत येथील अंगणवाडीमधील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप, जि. प. शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पनवेल ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप, रोडपाली शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे व खाऊ वाटप, मोहटादेवी नवीन पनवेल येथे संतोष आमले यांच्यातर्फे वृक्षरोपण, कोप्रोली येथील गतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे, बिस्किटे, खाऊ वाटप रोहिंजण येथील अनाथाश्रममधील मुलांना खाऊ वाटप व अन्नदान करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, रायगड जिल्हा अध्यक्ष नीलेश चव्हाण, पनवेल अध्यक्ष शंकर जाधव, संतोष आमले, पीआरपी जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे, अभिषेक पाटील, गुरुनाथ पाटील, प्रकाश जाधव, सीम मॅडम, शुभम खानविलकर, रोहन आदींनी शुभेच्छा दिल्या.