Saturday , March 25 2023
Breaking News

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आसूडगाव, पारगाव, खेरणे शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आसूडगाव, पारगाव, खेरणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विद्यार्थ्यांना वह्यावाटप करून त्यांना मार्गदर्शन केले. पनवेल तालुक्यातील आसूडगाव आणि खेरणे जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, अशोक  हुद्दार, बालम नाईक, रमेश नाईक, दिनेश खानावर, अशोक साळुंखे, बंडूशेठ गोंधळी, शैलेश माळी, चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र गोंधळी, संतोष गोंधळी, राजेंद्र गोंधळी, मधुकर गोंधळी, बाळाराम माळी, महेंद्र गोंधळी, प्रवीण गोंधळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पारगाव येथे पं. समिती सदस्य रेखा म्हात्रे, भाजपचे वडघर विभागीय अध्यक्ष के. ए. म्हात्रे, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य भगिरथ जितेकर, महेश बचुडे, रोशन जितेकर, गजानन जितेकर, दिनेश म्हात्रे, आर. डी. पाटील उपस्थित होते.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply