पेण : प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पेण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभाग अधिकारी अंकीता इसळ यांनी 80 सफाई कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट्स याबाबतीत प्रशिक्षण दिले. एसटी स्थानक, बाजारपेठ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांना दंड वसुल करण्यात येत असून जागोजागी दक्षता पथकाकडून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. विनामास्क फिरणार्या नागरिकांकडून 15 डिसेंबरपर्यत सुमारे 15 हजार 500 रुपयांची दंड वसुली करण्यात आली होती. त्यानंतर पून्हा धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आरोग्य अधिकारी अंकित इसाळ, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण यांच्यासह नगरपालिका कर्मचारी सहभागी झाले आहेत.