पनवेल ः रामप्रहर वृत्त
सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि स्व. ह.भ.प तुकाराम महाराज केदारी यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि कैलासवासी स्वर्गीय ह. भ. प. तुकाराम महाराज केदारी यांच्या स्मरर्णार्थ शेतकरी संजीवनी
योजनेंतर्गत 50 टक्के दराने शेतकर्यांना खत वाटप, पाच टक्के अपंगनिधी अंतर्गत सावळे गावातील अपंगांना धनादेश वाटप आणि वृक्षारोपण व सावळे गावातील सर्व कुटुंबांना क्लोरीवॅट वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच शिवाजी माळी, उपसरपंच सुजाता माळी, माजी सरपंच अविनाश गाताडे, संतोष माळी, माजी उपसरपंच भाऊ मते, अश्विनी कुरंगळे, अमृता म्हस्कर, ज्योती केदारी, ग्रामसेवक सतीश देवकसे, काशिनाथ कांबळे, महिला मोर्चाच्या लिना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.