
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई शहरात बुधवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळल्याने 200 चा आकडा पार केला आहे. गर्दीचे ठिकाण असलेले एपीएमसी व दाटीवाटीच्या समजल्या जाणार्या गावठाण व झोपडपट्टी भागात कोरोनचे रुग्ण आढळत असल्याने पालिका प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारी एकाच दिवसांत 43 रुग्ण आढळल्याने नवी मुंबईत खळबळ माजली होती. गेले तीन दिवस सतत चढत्या क्रमाने रुग्ण आढळत होते. मात्र बुधवारी हा आकडा कमी आल्याने नवी मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला. एकूण 206 रुग्णांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले त्यातील 98 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आले. यात एपीएमसीमधील चार जणांचा समावेश असल्याने बाजार समितीतील उपययोजनांनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विभागवार पोजिटिव्ह संख्या दि.29 एप्रिल पर्यंत बेलापूर 32, नेरुळ 32, तुर्भे सानपाडा 30, वाशी 4, कोपरखैरणे 38, घणसोली 19, ऐरोली 19, दिघा 5 एकूण 206 आहेत.