Tuesday , March 28 2023
Breaking News

बलात्कार करणार्या आरोपीस सक्तमजुरी

महाड : प्रतिनिधी

महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रोहीत उर्फ गोम्या रामचंद्र महाडीक (रा. खर्डी, ता. महाड) याला माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 9) 10 वर्षे सक्तमजुरी आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी रोहीत महाडीक याने मे 2016 मध्ये गावातील शिलाई काम करणार्‍या महिलेच्या घरात घुसून तू दुसर्‍या पुरुषासोबत फिरत असतेस, ही माहिती तुझ्या आई वडिलांना दोतो, अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. पुढे वारंवार धमकी देत आरोपीने स्वतःच्या घरात या महिलेवर चार ते पाच वेळा बलात्कार केला. या दरम्यान पिडीत महिला गरोदर राहिल्याची बाब समोर आली. या प्रकरणी ऑगस्ट 2016धषध्ये महाड तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादिच्या जबानीवरुन आरोपी रोहीत महाडीक विरोधात भादवि कलम 376, 376 (2)(एन), 452, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक मा. शा. पाटील यांनी या प्रकरणी योग्य तपास करुन आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी माणगाव येथील विशेष सत्र न्यायालयासमोर झाली.  सहाय्यक सरकारी वकिल अमित देशमुख यांनी पिडीत महिलेच्या बाजुने प्रभावीपणे युक्तिवाद करुन महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले होते. विशेष सत्र न्यायाधिश टी. एम. जहागीरदार यांनी  मंगळवारी आरोपी रोहीत उर्फ गोम्या रामचंद्र महाडीक यास भादवि कलम 376 अन्वये दोषी ठरवून 7 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंड व कलम 506 अन्वये 3 वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply