Thursday , March 23 2023
Breaking News

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची द्रविडकडे धुरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टीम इंडियाच्या भविष्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्विट करून ही माहिती दिली. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणार्‍या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी द्रविडकडे धुरा सोपविण्यात आली आहे.

19 वर्षांखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचे काम द्रविडच्या खांद्यावर असणार आहे. याचसोबत द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणार्‍या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाच्या नेमणुकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.

राहुल द्रविड याआधी भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. द्रविडला मिळालेल्या पदोन्नतीमुळे पारस म्हांब्रे आणि अभय शर्मा यांच्याकडे 19 वर्षांखालील क्रिकेट संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडू हे वैद्यकीय सल्ल्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये येत असतात. येथे प्रशिक्षित डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी होते. यासंदर्भात भारतीय संघ व्यवस्थापनाला द्रविड अहवाल सोपवेल.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply