Breaking News

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा; ब्राझील नवव्यांदा विजेता

रिओ दी जानेरो : वृत्तसंस्था

ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेरू संघावर 3-1 अशी दणदणीत मात करून विजेतेपद पटकाविले. ब्राझीलचे हे एकूण नववे विजेतेपद ठरले. 2007नंतर प्रथमच त्यांनी जेतेपदावर नाव कोरले.

इस्टाडिओ डू मार्काना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. ईव्हर्टन सोरेसने 15व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाचे खाते उघडले. जीससने केलेल्या पासचे गोलजाळ्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सोरेसने गोलमध्ये रूपांतर करून ब्राझीलला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पेरूच्या ख्रिस्टियन क्युवाने टोलवलेला चेंडू ब्राझीलच्या थिआगो सिल्व्हाच्या हाताला लागल्याने पेरूला पेनल्टी बहाल करण्यात आली. पावलो ग्वेरेरोने याचा पुरेपूर लाभ घेत पेरूला 44व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली, परंतु भरपाई वेळेत ब्राझीलने लगेचच गोल नोंदवून पुन्हा आघाडी मिळवली. जिससने संघासाठी दुसरा गोल झळकावून ब्राझीलला 45+3 मिनिटाला 2-1चे वर्चस्व मिळवून दिले.

70व्या मिनिटाला जिससला लाल कार्ड दाखवल्यामुळे अखेरची 20 मिनिटे ब्राझीलवर 10 खेळाडूंसह खेळण्याची नामुष्की ओढवली. 89व्या मिनिटाला पेरूच्या झब्रॅनोने ब्राझीलच्या रिचर्डसनला पेनल्टी क्षेत्रात पाडल्याने ब्राझीलला पेनल्टी मिळाली. रिचर्डसननेच या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून 90व्या मिनिटाला ब्राझीलसाठी तिसरा गोल झळकावून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply