Breaking News

पीडितेला न्याय मिळण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार; महिला प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांचा रोह्यात निर्धार

रोहा : प्रतिनिधी

रोहे अष्टमी येथे 28 फेब्रुवारी रोजी घडलेली घटना, ती घटना दाबण्याचा प्रशासकीय पातळीवर झालेला प्रयत्न याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आमच्यासाठी हे राजकीय आंदोलन नाही तर पीडीतेच्या न्याय हक्काची लढाई आहे व आम्ही हा मुद्दा सभागृहात व सभागृहाच्या बाहेर पिडितेला न्याय मिळेपर्यंत ताकदीने लाऊन धरणार असल्याचे भाजप महिला प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी सांगितले.

रोहा भाजप तर्फे शुक्रवारी (दि. 13) रोहे अष्टमी येथे घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रोहा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व भाजप महिला प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी केले, मोर्चानंतर त्यांनी रोह्यातील पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद साधला.

या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हा महिला अध्यक्षा तथा पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय कोनकर, राजेश मापारा, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विक्रुतीला जात, धर्म नसतो असे सांगतांनाच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले तातडीने उचलली नसल्याबाबत खंत व्यक्त करून आरोपीला 376 लागले गेले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असल्याचे  नाईक यांनी या वेळी सांगितले.

पिडीत बालिका ही मतिमंद असल्याने तिला व्यक्त होण्यात अडथळे येत आहेत त्यामुळे पोलीस अधिकारी, तहसीलदार यांनी तिच्या पालकांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच पीडीतेच्या वैद्यकीय तपासणीस विलंब

झाल्याबद्दलही त्यांनी यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून आरोपीला पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचे भाजप महिला प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी सांगितले.

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या विषयी आवश्यक तो सर्व पाठपुरावा वेळच्या वेळी येथील स्थानिक

नेतृत्वाकडुन करण्यात येईल असे सांगून प्रदेश कार्यकारिणी देखील याबाबतीत आमच्या ठामपणे पाठिशी असल्याचे नमूद केले.

पूर्ण ताकदीने हा लढा पीडित मुलीच्या भवितव्याच्या द्रुष्टीने तिला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न व्हावेत व तिचे योग्य प्रकारे समुपदेशन व्हावे अशी अपेक्षा भाजप महिला प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी व्यक्त केली. पिडीतेला न्याय मिळेपर्यंत पूर्ण ताकदीने हा लढा भाजपच्या वतीने लढण्यात येईल असेही नाईक यांनी पत्रकारांना सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply