सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन
कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे गावातील विविध समस्यांबाबत नगरसेविका कुसुम रवींद्र म्हात्रे यांच्या वतीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले आहे.
कामोठे गावातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यांवर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबत नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसंदर्भात माझ्याकडे अनेक वेळा तकारी केल्या आहेत. तसेच अनेक समस्या उद्भवत आहेत. कामोठे गावात नव्याने रस्ता क्राँक्रिटीकरण करण्यात यावा. अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे ही कठीण होत आहे. मागील काही दिवसांत पाऊस पडल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. या वेळी नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसंदर्भात अनेक वेळा तकारी केल्या आहेत.
याचप्रमाणे येथील ड्रेनेज सुध्दा अनेक ठिकाणी खचलेला आहे. ड्रेनेज नव्याने तयार करण्यात यावे. रस्ता तयार करताना रस्त्यामधुन जाणार्या ड्रेनेज विट बांधकाम न करता सिमेंटचे पक्के बाधकाम काँक्रिटी बॉक्स करण्यात यावे. पाण्याची नव्याने पाइपलाइन टाकण्यात यावी. त्यांचसोबत रस्ता काँक्रिटीकरण झाल्यानंतर नव्याने लाईटच्या वायार व नवीलाईटचे पोल टाकण्यात यावे. रस्त्याची कामे संबंधित खात्याच्या अंतर्गत तातडीने करण्यात यावी व कामोठ्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, असे नगरसेविका कुसूम म्हात्रे यांनी निवेदनात नमुद केले आहे.