Breaking News

उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर

राज्यात गुरुवार (दि. 22) पासून नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, दुध विक्रीची दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देले आहेत. त्यांची माहिती पोलिसांच्या गाडीतून लाऊड स्पिकरद्वारे संपूर्ण उरण शहरात देण्यात आली. यामध्ये नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिरनेर, जासई, बोकडवीरा, राघोबा मंदिर कोट गाव, वैष्णवी हॉटेल, उरण चारफाटा आदी ठिकाणी हा बंदोबस्त ठेवण्यात आला असून यात एक पोलीस निरीक्षक, सात अधिकारी, 24 कर्मचारी, चार भरारीपथक (बीट मार्शल)चा समावेश आहे. त्याचप्रमाणे रायगड सुरक्षा रक्षक मंडळ सिडको ट्राफिक वार्डन उरण वाहतूक शाखेचे रामधन पठे, अंकुश शिवकर, सचिन भगत हे उरण शहरातील राजपाल नाका येथे बंदोबस्त करीत होते.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. वाहन चालकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अन्यथा त्यांच्यावर  कडक कारवाई केली जाईल.

-रवींद्र बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply