Breaking News

गाढी नदीत दुचाकीसह दाम्पत्य गेले वाहून

पनवेल : बातमीदार

जलमय झालेला पूल मोटरसायकलवरून पार करणारे दाम्पत्य गाढी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी पनवेल तालुक्यातील उमरोली येथे घडली. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पोलिसांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) त्यांचा शोध घेत आहेत.

मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. माथेरानच्या डोंगररांगांमध्येही मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीतील पाण्याची पातळी वाढून उमरोली गावाचा पनवेलशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उमरोली येथील निर्मिती गार्डनमध्ये राहणारा आदित्य आंब्रे व त्याची पत्नी सारिका आंब्रे मोटरसायकलवरून नदीवरील छोट्या पुलावरून पनवेलकडे जात होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते दुचाकीसह नदीमधून वाहून गेले. नागरिकांनी याविषयी पोलीस व महसूल प्रशासनाला माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांचा तपास न लागल्यामुळे खोपोलीवरून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले.

नदीमध्ये वाहून गेलेला आदित्य आंब्रे मूळचा महाड तालुक्यातील दहिवड गावचा रहिवासी आहे. नेरूळमध्ये क्रोमा शोरूममध्ये तो नोकरी करतो. डिसेंबर 2018मध्ये त्याचा सारिकासोबत विवाह झाला होता. सारिकाचे आई-वडील नेरूळमध्ये राहतात. दुर्घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply