कर्जत : बातमीदार
नेरळ बाजारात मास्क न लावता मोठ्या प्रमाणात नागरिक, ग्रामस्थ फिरत आहेत. त्यांना मास्क वापरण्याची सवय व्हावी म्हणून जनजागृती मोहीम रविवारी (दि. 30) नेरळ व्यापारी फेडरेशनने राबविली. दरम्यान, नेरळ बाजारपेठेत रॅली काढून मास्क वापरण्याचे आवाहन करीत व्यापारी फेडरेशनने मास्कचे वाटप केले. रॅलीमध्ये फेडरेशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, उपाध्यक्ष निलेश शहा, कार्याध्यक्ष दादा गायकवाड, सचिव जहिद नजे, ललित जैन, ज्येष्ठ सदस्य भगवान चव्हाण, अरविंद कटारिया, रोहिदास मोरे, रुपेश गांधी, हेमंत क्षीरसागर, बंटी पटेल, सुनील शहा, आदी व्यापारी सहभागी झाले होते.