रोजंदारी कर्मचार्यांना सेवेत कायम करावे

पेण : प्रतिनिधी
नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्यासाठी पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. पेण नगर परिषदेत अनेक कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून रोजंदारीवर काम करीत असून, त्यांची सेवेत कायम करण्याची मागणी आहे. रोजंदारीवरील कामगारांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना नगर परिषदेत कायम करावे, असे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे मत आहे. तशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचार्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी नगराध्यक्षांना धन्यवाद दिले आहेत.