Breaking News

रामायण अध्ययन प्रेरणादायी -राज्यपाल

मुंबई : प्रतिनिधी

रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते.  रामायण अध्ययन प्रेरणादायी असून, त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करू शकतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले. मुंबई विश्व विद्यालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे मुंबईतील कलिना येथील ग्रीन टेक्नोलॉजी सभागृहात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. उद्घाटन समारंभास भागवताचार्य रमेश ओझा, मुंबई विश्वविद्यालय कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, उपकुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, दीपक मुकादम, जपानच्या हिंदी भाषा अभ्यासक डॉ. तोमोको किकुची, तसेच अन्य देशातील आणि महाविद्यालयातील हिंदी भाषेतील तज्ञ

उपस्थित होते. नानकदेव, तसेच अन्य संतांनीही आपापल्या वाड़मयात रामायणाचा उल्लेख केला आहे. आज रामायणाचा अंगीकार सर्व देश करीत आहे. सर्वांनी उत्तम गुणांचा अंगिकारल्यास, समाज निश्चितपणे रामराज्याकडे वाटचाल करील, असा विश्वास कोश्यारी यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply