Breaking News

अतिधोकादायक इमारत, बांधकामे महापालिकेकडून जमिनदोस्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीतील अतिधोदायक इमारत व अनधिकृत बांधकामे महापालिकेने गुरुवारी (दि. 11) पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त केली. ही कारवाई आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त जमीर लेंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग अधिकार्‍यांनी पार पाडली. शनी मंदिराजवळील मूलचंद हरदेवप्रसाद गुप्ता यांचे दुकान अतिधोकायदायक असल्याने तेही जमिनदोस्त करण्यात आले. पालिकेने याबाबत वारंवार नोटिसा दिल्या होत्या, अखेर अधिनियमातील कलम 265 नुसार इमारत निष्कासित करण्यात आली. कच्छी मोहल्ला, तहसील कार्यालयाजवळ, साई नगर, कर्नाळा स्पोर्टस येथील अनधिकृत दुकाने व टपर्‍या काही लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण करुन अनधिकृतपणे उभारल्या होत्या. त्यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. ही बांधकामेही निष्कासित करण्यात आली. या मोहिमेत प्रभाग अधिकारी भगवान पाटील, हरिश्चंद्र कडू, सुरेश गांगरे, श्रीराम हजारे, परवाना विभागप्रमुख सदाशिव कवठे हे सहभागी झाले होते. महापालिकेच्या चारही प्रभागात 219 धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply